Congress News : पुण्यातील काँग्रेस भवनासमोर तुफान राडा झाला. आंदोलन करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दगड फेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दगडफेकीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला लागून तो रक्तबंबाळ झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दगडफेकीमध्ये काँग्रेसमधील गाड्या फुटल्याचे देखील दिसत आहे. तसेच पोलिसांना देखील दगड लागल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस कार्यकर्ते या घटनेनंतर प्रचंड संतप्त झाले. त्यांनी थेट पोलिसांना गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा बांगड्या भरा, असे इशारा दिला.
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक प्रशांत जगताप हे प्रचंड संतप्त झाले होते. गुन्हा दाखल केला नाही म्हणून फरासखाना पोलिस ठाण्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला.
अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, ही तिसरी वेळ आहे आमच्या पक्षावर हल्ला करण्याची. आमच्या पक्षावर तीन वेळा हल्ला करून देखील गुन्हा दाखल होत नाही. मी पत्र दिलं आहे. आज दुष्यंत मोहोळ याने हल्ला केला. नगरसेवक पोळ याने दगडफेक केली त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आमच्यावरच गुन्हा दाखल करा अशी आमची परिस्थिती आहे. पोलिसांनी काळजी घेतली असती तर काँग्रेस कार्यकर्त्याचे रक्त सांडले नसते.
भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा ते प्रयत्न करत होते. घोषणाबाजी करत होते. या गोंधळामध्ये काँग्रेसमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये पोलिस देखील जखमी झाल्याचे तसेच एक दगड काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्याला लागला. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. आणि भाजप कार्यकर्त्यांनी पळ काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.