Kaustubh Navale Sarkarnama
पुणे

आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेसची यंग ब्रिगेड उतरणार रिंगणात...

२०२२ ला पिंपरी पालिकेत काँग्रेस पु्न्हा खाते उघडेल,अशी आशा पक्षाला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : राज्यातील जिल्हा युवक काँग्रेसची (Congress) निवडणूक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने झाली. त्यात पिंपरी-चिंचवड शहर(Pimpri-Chinchwad) जिल्हा युवक अध्यक्षपदी कौस्तूभ नवले (Kaustubh Navale) यांची निवड झाली. ते माजी खासदार नाना ऊर्फ विदूरा नवले यांचे नातू आहेत. युवकांच्या अधिक संधीसाठी प्रयत्नशील राहणार असून आगामी पालिका निवडणुकीत (PCMC Election-2022) युवकांना जास्त संख्येने उमेदवारी देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी या निवडीनंतर 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

कौस्तूभ यांचे घराणे राजकीय आहे. तसेच ते पक्के काँग्रेसीही आहेत. आजकाल संधी पाहून एक व्यक्ती लगेचच सर्व पक्ष फिरून येतात. पण, नवले घराण्याच्या तीन पिढ्या कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहेत. आजोबा नाना नवले हे कॉंग्रेसचे माजी खासदार आहेत. तसेच ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. वडिल राजकारणापासून अलिप्त राहिले. तर, मातोश्री विद्या या माजी नगरसेविका आहेत. त्या २००२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका होत्या. त्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पालिकेत सत्तेत होती. तेव्हापासून हळूहळू क़ॉंग्रेसला शहरात ओहोटी लागली ती शून्य नगरसेवक होऊनच २०१७ ला थांबली.

आता २०२२ ला पिंपरी पालिकेत पु्न्हा खाते उघडू, अशी आशा पक्षाला आहे. कौस्तूभ यांनीही आजोबानंतर आईच्या पावलावर पाऊल टाकत पक्ष संघटनेत काम ,सुरु केले. एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष नंतर युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तर, आता शहर युवकची जबाबदारी त्यांच्याकडे तीन वर्षासाठी आली आहे. राजकीय वारस असला, तरी आपली निवड ही ऑनलाईन पद्धतीने लोकशाही मार्गाने झाली असल्याने त्यासाठी कुणाचा वरदहस्त नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याअगोदर नरेंद्र बनसोडे हे युवकचे शहराध्यक्ष होते. त्यांनी दोनवेळा हे पद भुषविले. पूर्वी युवकचे शहराध्यक्षपद हे जिल्हा नाही, तर लोकसभा मतदारसंघनिहाय होते. २०१८ पासून ते जिल्हानिहाय केले गेले. त्यातून मावळ लोकसभा आणि नंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष होण्याचा एकमेव मान बनसोडे यांना मिळालेला आहे. ते एजबार झाले नसते (३५ प्लस), तर त्यांची हँटट्रिकही झाली असती. पिंपरी-चिंचवड आणि पुणे बार असोसिएशन तथा वकिल संघटनेच्या निवडणुकीची किनार या निवडणुकीला आहे. जो सर्वाधिक सदस्य करील, तो अध्यक्ष म्हणून निवडून येतो. नवले यांना तीन हजार ६९८ एवढी मते मिळाली. युवक शहर कार्यकारिणीत तीन उपाध्यक्ष (चंद्रशेखर जाधव, स्वप्नील बनसोडे, अपूर्वा इंगवले), सात सरचिटणीस (सौरभ शिंदे, अजिंक्य बारणे, विशाल कसबे, करसनसिंग गिल, विनिता तिवारी, वसीम शेख आणि सोनाली खंदारे) आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT