Government cracks down on fertilizer dealers, suspending 15 agriculture service center licenses. sarkarnama
पुणे

Crackdown on Fertilizer Dealers: खत विक्रेत्यांवर ‘धडक’ कारवाई! 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; दौंड, इंदापूरमधील सर्वाधिक

Agriculture Service Centers Suspended :जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान तब्बल ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर असल्याचे उघड झाले.

Sudesh Mitkar

Pune News : खरीप हंगामाच्या तोंडावरच पुणे जिल्हा प्रशासनाने खत विक्रेत्यांवर मोठी कारवाई करत १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. पॉस (POS) मशीनवरील नोंदी आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान तब्बल ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर असल्याचे उघड झाले. प्रत्यक्षात हा साठा विक्री होऊनही प्रणालीतून कमी करण्यात आलेला नव्हता. परिणामी, खताच्या पुरवठा आणि नियोजनात गंभीर अडथळे निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

या कारवाईत सर्वाधिक फटका दौंड तालुका येथील विक्रेत्यांना बसला असून, एकूण ७ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या सर्व १५ केंद्रांना निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारच्या खत विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या केंद्रांकडून खते खरेदी करू नयेत, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पॉस प्रणालीतील नोंदी अद्ययावत न ठेवणे आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे ही गंभीर बाब मानली जात असून, यापुढेही अशी तपासणी मोहीम अधिक कडकपणे राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय निलंबित कृषी सेवा केंद्रे

दौंड : अदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे), श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू)

इंदापूर : महेश फर्टिलायझर (आगोती नं. १), गणेश ॲग्रो एजन्सी (कळस)

जुन्नर : विघ्नहर कृषी सेवा केंद्र (नारायणगाव), कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी (जुन्नर)

शिरूर : विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र (मांडवगण फराटा)

भोर : श्री भैरवनाथ शेती भांडार (वेळू)

आंबेगाव : शेतकरीराजा कृषी उद्योग (गावडेवाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT