Uddhav Thackeray, Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

भ्रष्टाचार, खंडणी वसुलीशिवाय महाआघाडीचे कर्तृत्व तरी काय?

जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा केला. यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत. या प्रकरणावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ''भ्रष्टाचार, खंडणी वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही. आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलीकडे दुसरा उद्योग नाही. जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे. संपूर्ण भाजप आशिष शेलार यांच्या पाठीशी आहे!''

दरम्यान, किरोशी पेडणेकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आता या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मात्र, यावरुन भाजप, शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे राऊत आक्षेपार्ह बोलत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील इतर नेते वाट्टेल ते बोलत आहेत. तुम्हांला एक न्याय व आमचे नेते जे काही बोलले नाही, त्यासाठी त्यांना वेगळा न्याय! सरकारच्या विरोधात बोलणार्‍या विरोधी पक्ष नेत्यांवर अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जातात. सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT