Cyber ​​crime
Cyber ​​crime Sarkarnama
पुणे

Pune Cyber Crime : मोठी बातमी: स्टेट बॅंकेवर सायबर दरोडा

सरकारनामा ब्युरो

Cyber Crime news : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्टेट बॅंकेच्या (SBI) मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरलाच सायबर चोरट्यांनी चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सायबर चोरट्यांनी एक दोन नव्हे तर मुख्य ट्रेझरी शाखेमधून १९ लाख रुपये गायब केले आहेत. शहरातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिकाचे नाव वापरत तब्बल 19 लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ट्रेझरी शाखेत शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन एक बनावट मेल पाठवण्यात आला. तसेच स्टेट बॉंकेच्या मॅनेजरला मी तुमचा "valuable" कस्टमर असे सांगून नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत तातडीने पैसे ड्राफ्ट करायला सांगितले. बँकेचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी २ वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.

पण काही वेळातच हा सगळा प्रकार बनावट असल्याचं ब्रांच मॅनेजरच्या लक्षात आलं आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

बुधवारी (२० डिसेंबर) दुपारी पुण्यातील डॉ. आंबेडकर रोडवरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत उपशाखा अधिकारी दिलीपकुमार यांना एका क्रमांकावरून फोन आला. आपण चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या कंपनीचा डायरेक्टर किशोरकुमार शहा बोलत असल्याचं संबंधित व्यक्तीने दिलीपकुमार यांना सांगितलं. तसेच आपला नातेवाईक आजारी असून त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आपल्याला पैशांची तातडीची गरज आहे. चंदुकाका सराफ यांच्या बँक अकाऊंटवरून आरटीजीएसद्वारे तात्काळ रक्कम ट्रान्सफर करा, अशी विनंती त्याने केली. त्यानुसार बॅंकेच्या खात्यातून एकूण १९ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पण हा कॉल खोटा असल्याचे लक्षात येताच दिलीपकुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT