Farmer Loan Waiver Update; Dattatray Bharne Sarkarnama
पुणे

Dattatray Bharane: कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार? कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी थेट तारीखच सांगितली

Maharashtra Farmer Loan Waiver, Ahilyadevi Holkar Loan Waiver, Dattatray Bharane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची लाभार्थी यादी अंतिम टप्प्यात असून पडताळणीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सरकारनामा ब्यूरो

Ahilyadevi Holkar Loan Waiver: राज्यभरातील शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या योजनेबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची प्राथमिक यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात कृषी महाविद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भरणे यांनी ही माहिती दिली. भरणे यांच्या या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कर्जमाफीसाठी ३० जूनची मुदत जाहीर केली होती. मात्र, लाभार्थ्यांची यादी अचूक तयार व्हावी आणि पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकारकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर पडताळणी आणि नियोजनाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशन, दोन्ही सभागृहांची मंजुरी आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीसह आवश्यक वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीत काहीसा विलंब झाला. पण सरकारचा उद्देश केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा हा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची काटेकोर छाननी केली जात आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून प्राप्त झाली असून, त्या आधारे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ३० जुलैपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असेही भरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT