Jayakumar Gore-Dattatreya Bharane

 

sarkarnama

पुणे

राज्यमंत्री भरणेंची ऑफर आमदार जयकुमार गोरे स्वीकारणार का?

दत्तात्रेय भरणेंनी दिली भाजप आमदार जयकुमार गोरेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर

मिलिंद संगई

बारामती : बारामतीतील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (ajit pawar) कौतुक करणारे भारतीय जनता पक्षाचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनी अडवळणाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करण्याची ऑफर देऊन टाकली. भरणे म्हणाले, ‘जयकुमार भाऊ तुम्ही आज आमच्या नेत्यांचा एवढा चांगला उल्लेख केला, असाच चांगला विचार भविष्यात करा,’ असा सल्ला दिला. त्यामुळे आमदार गोरे आता भरणेमामांची ऑफर स्वीकारणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Dattatreya Bharane offers BJP MLA Jayakumar Gore's join NCP)

बारामती येथील डॉ. आशिष जळक आणि डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. मात्र, गर्दी टाळण्यासाठी त्यांनी वेळेपूर्वी तासभर येत उदघाटन उरकून निघून गेले होते. त्यानंतर तासाभारानंतर आमदार गोरे आणि राज्यमंत्री भरणे हे कार्यक्रमाला पोचले, त्यावेळी आयोजकांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. त्यावेळी आमदार गोरे यांनी अजित पवारांचे जाहीरपणे कौतुक केले.

भरणे म्हणाले की, भाऊ तुमचे काम मी जवळून पाहिले आहे. चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ता आहात. तुम्ही आज आमच्या नेत्यांचा एवढा चांगला उल्लेख केला, तसाच विचार आगामी काळात करा, असे म्हणत राज्यमंत्र्यांनी अडवळणाने आमदार गोरेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर देऊन टाकली.

काय म्हणाले होते जयकुमार गोरे?

आमची राजकीय भूमिका काहीही असो पण मी अजितदादा पवार यांचा फॅन आहे. त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, हे जाहीरपणे सांगायला मला संकोच वाटत नाही. दादांकडे निर्णय घेण्याची धडाडी व धाडस आहे, ते स्पष्टवक्ते आहेत, त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे, असे आमदार गोरे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT