Rajesh Jadhav
Rajesh Jadhav sarkarnama
पुणे

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

-प्रफुल्ल भंडारी

दौंड  : दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना युतीचा नगरसेवक राजेश जाधव (NCP corporator Rajesh Jadhav) यांच्याविरूध्द बेकायदा खासगी सावकारी आणि विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात राजेश जाधव याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ (अ) ( क) आणि भारतीय दंड विधान ३५४ (विनयभंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. शहरातील एका विवाहितेस राजेश शामराव जाधव (वय ४६, रा. गोवा गल्ली, दौंड) (NCP corporator Rajesh Jadhav) याने डिसेंबर २०१९ मध्ये मासिक आठ टक्के व्याजदराने दोन लाख रूपये उसने दिले होते. याविवाहितेने ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०२० पर्यंत दरमहा सोळा हजार रूपये व्याज दिले. परंतु त्यानंतर व्याज देण्याचे बंद केल्याने राजेश जाधव याने त्या महिलेला विचारणा करी दमदाटी व शिवीगाळ केली. १० ऑक्टोबर २०२१ रोजी राजेश जाधव याने व्याज आणि मुद्दलच्या मागणीसाठी पुन्हा दमदाटी करून रस्त्यावर विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

विवाहितेच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात राजेश जाधव याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ (अ) ( क) आणि भारतीय दंड विधान ३५४ (विनयभंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शिवसेना युतीच्या वतीने राजेश जाधव याने मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. राजेश जाधव याला यापूर्वी १५ फेब्रुवारी २०१६ , २५ जुलै २०१६ व ४ जानेवारी २०१७ रोजी मटका जुगार प्रकरणी अटक करण्यात आली होती. राजेश जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक ५ (ब) मधून १५ डिसेंबर २०१६ रोजी निवडून आला आहे.

भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे, कोणतीही चैाकशी नाही, शांत झोप लागते...

मावळ (पुणे) : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्या मिश्किलभाषणामुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसापूवी त्यांनी ''मी राजकारणात आलो नसतो तर अभिनेता झालो असतो,'' असे विधान केलं होतं. अशाच प्रकारचे विधान काल त्यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. मावळ परिसरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''मला आता एका व्यक्तीने विचारले की तुम्ही भाजपमध्ये का गेले, त्यांना मी म्हटलं, 'हे तुम्ही तुमच्या साहेबांना विचारा. तर ते म्हणाले, 'तेवढं सोडून बोला', मी पण त्यांना सांगितलं की तेवढं सोडून विचारा.'' हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) कॉग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी आपण का भाजपमध्ये (bjp) आलो याचं उत्तर यावेळी दिलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT