Balasaheb Mandekar, brother of NCP MLA Shankar Mandekar, arrested in connection with the Daund firing at New Ambika Kala Kendra, Pune district. Sarkarnama
पुणे

मोठी बातमी : दौंड कलाकेंद्र गोळीबार प्रकरणात पोलिसांचा दणका : राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाच्या मुसक्या आवळल्या

Daund Firing News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांना अटक करण्यात आली आहे.

Hrishikesh Nalagune

Daund Firing News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांना अटक करण्यात आली आहे. ते भोर- वेल्हा-मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू आहेत. मांडेकरांसोबतच अन्य दोघांनाही आज (दि. 24) पहाटे पाच वाजता अटक झाल्याची माहिती आहे. मात्र ओळख परेड झाली नसल्याने पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

कलाकेंद्रातील गोळीबाराप्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांच्यासोबत गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील चंद्रकांत मारणे अद्याप फरार असून त्याचाही शोध सुरु आहे. दरम्यान, अटक झालेल्या तिघांचीही कलाकेंद्रातील नृत्यांगणा आणि अन्य उपस्थितांसमोर ओळख परेड होणार आहे. त्यानंतर तिघांची नावे आणि अन्य माहिती उघड केली जातील, अशी माहिती आहे.

चौफुला परिसरात 3 कला केंद्र आहेत. यातील न्यू अंबिका आणि अंबिका कला केंद्र ही दोन्ही एकाच मालकाची आहेत. यात गाणी, नृत्य, लावणी अशा कला सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे तिन्ही कला केंद्रांमध्ये कार्यक्रम सुरु होते. मात्र दोन गटांमध्ये आवडीची लावणी सादर करायला लावण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच गोळीबार झाला. यात एक नृत्यांगणा जखमी झाल्याची चर्चा आहे.

मंगळवारी सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला तिन्ही कलाकेंद्र मालकांनी कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरु केला. यात न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांच्यासह 6 महिलांना ताब्यात घेतले.

कोण जखमी झाले का?

दरम्यान, पोलिसांनी अद्यापही यात कोणी जखमी झाले आहे की नाही? किती गोळ्या चालविल्या गेल्या? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. आरोपींबाबतही माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी आधी पत्रकार परिषदेत बाळासाहेब ऐवजी बाबासाहेब असे नाव सांगितले. पण संपूर्ण नाव आणि पत्ता पूर्ण सांगायला नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT