Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati News : अजितदादांचा 'माळेगाव'च्या अध्यक्षांना निरोप; मोळी पूजन टाळले!

Maratha Reservation : "स्थानिक शेतकऱ्यांच्या हस्ते मोळीपूजन करावे," असा निरोप अजितदादांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे.

Mangesh Mahale

Baramati Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (शनिवारी) माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मोळी पूजन कार्यक्रम होता, पण कालपासून (शुक्रवार) मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या विरोधामुळे अजितदादांनी कार्यक्रमास जाणे टाळलं.

माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमास अजित पवार यांना जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. अजित पवारांच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त कारखाना परिसरात आहे. पोलिस अधीक्षकांसह 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चांचे कार्यकर्त्यांनीही परिसरात गर्दी केली आहे. दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर पोलिस, मराठा क्रांती मोर्चा व कारखाना प्रशासनाने बैठक बोलावली होती. पण बैठक फिस्कटली. नियोजित कार्यक्रम असल्याने तो होऊ द्यावा, सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी भूमिका कारखाना आणि पोलिस प्रशासनाने मांडली. मात्र, सकल मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिला आहे.

मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला गावात फिरू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याचा कार्यक्रमास अजितदादा येणार असल्याने आंदोलकांनी त्यांना विरोध केला होता. या विरोधामुळे अजितदादांनी कार्यक्रमास जाणे टाळलं.

"स्थानिक शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी पूजन करावे," असा निरोप अजितदादांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT