Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar on Sharad Pawar : साहेब अन् दादा वेगळे नाहीत ; अजितदादा असं का म्हणाले ?

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर दोन्ही पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गट (शरद पवार गट, अजित पवार गट) एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहे. हे दोन्ही गट वेगळे नसल्याचे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजितदादा शिरुर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. दोन्ही गट वेगळं नाहीत, असे ते म्हणाले.

शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्रच असल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे. "साहेब आणि दादा तेव्हाही वेगवेगळे नव्हतो, आजही नाही, काळजी करु नका," असे अजित पवार म्हणाले.

"तरूणांनी राजकारण यावे,"असे आवाहन अजित पवार यांनी केलं. "वडिलधाऱ्यांच्या आर्शीवार्दाने आणि मार्गदर्शनाखाली तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात यायला हवं. त्यांनी शिकलं पाहिजे. पुर्वीपासून राजकारणात तरूणांमध्ये एक वेगळं आकर्षक आहे. त्यामुळे तरूणांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरूणांनी सक्रिय राजकारण, समाजकारणात यायला पाहिजे," असं म्हणत अजित पवारांनी तरुणांना संधी देण्यासाठीचे संकेत शिरुरमध्ये दिले.

अजित पवार हे सकाळी लवकरच कामाला सुरवात करतात, याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपल्याला शरद पवारांनी ही सवय लावली असे सांगितले.अजित पवार म्हणाले, "सकाळी लवकर कामाला सुरवात करण्याची सवय शरद पवारांनी लावली. म्हणूनच सकाळी सात वाजताच कामाला सुरवात करीत असतो,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT