Shivajirao Adhalrao Patil and Amol Kolhe New  Sarkarnama
पुणे

Adhalrao Patil vs Amol Kolhe: पुणे-नाशिक रेल्वेचा श्रेयवाद पुन्हा पेटला ? शिरुरच्या आजी - माजी खासदारांमध्ये जुंपली

सरकारनामा ब्यूरो

Shirur News: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात पुणे-नाशिक रेल्वेच्या श्रेयवादाचा वाद चांगलचा पेटला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवरून शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

"कोकणात रेल्वे प्रत्यक्षात आणायला २७ वर्षे लागली, तशाच पध्दतीची पुणे-नाशिक रेल्वे खासदार डॉ.अमोल कोल्हे दोनच वर्षात मार्गी लावलीय म्हणतात. मी १५ वर्षे यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांना कसे समजत नाही. मतदारसंघात न फिरता शुटींग करुन असे प्रकल्प मार्गी लागतात का", असा सवाल करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी थेट कोल्हेंना डिवचले. त्यांच्या या टिकेचा व्हिडिओही व्हायरल झाला.

आढळरावांच्या या टिकेला कोल्हेंनेही जोरदार प्रतित्युतर देत थेट आढळरावांचे वय काढत आपल्याला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय तो शुटींगमुळे नाही तर लोकसभेतील उपस्थितीसह चांगल्या कामगिरीमुळेच, असे म्हणत आढळराव हे उगाच शिळ्या कढीला उत आणत आहेत, असा जोरदार पलटवार अमोल कोल्हेंनी केला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा २०१९ च्या निवडणुकीत झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा असून आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे आणि आढळराव पटलांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

आढळराव हे सध्या मतदारसंघ पिंजून काढत असून दुसरीकडे कोल्हे देखील अ‍ॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा खासदार डॉ.कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT