Mahavikas Aghadi News :  Vajramuth Sabha
Mahavikas Aghadi News : Vajramuth Sabha Sarkarnama
पुणे

Pune Vajramuth Sabha: ठरलं ! वज्रमूठ सभांचा धडाका होणार सुरू; पहिली सभा पुण्यात..

सरकारनामा ब्यूरो

Vajramuth Sabha In Pune : मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या उर्वरीत वज्रमूठ सभा कधी पार पडणार याबाबत चर्चा होत होती. कर्नाटकामधील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पुण्यात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ही सभा आयोजित करण्याची चाचपणी आता महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात स्थानिका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाले आहेत. (Latest Marathi News)

पुण्यातील ही सभा नेमकी कोणत्या तारखेला होणार याबाबतीतला निर्णय महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घेणार आहेत. मात्र पुण्यातील सभेचं स्थळ कोणतं असावं, याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेणार आहेत. सभास्थळ निश्चित करावे, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आले.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा स्थगित केल्या होत्या. मात्र आगामी लोकसभेसाठी जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्यानंतर या वज्रमूठ सभा पार पडणार की नाही, याबाबत संधिग्धता निर्माण झाली होती. आता पुण्याच्या सभेतूनच या उर्वरीत वज्रमूठ सभा परा पडणार आहे. अशा हालचाली महाविकास आघाडीकडून सुरू झाल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची काँग्रेस भवन येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी पुण्यातली सभेच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. आता जून महिन्यात पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा खुल्या मैदानात पार पडणार की बंदीस्त सभागृहात होणार याबाबतही चाचपणी होत आहे. याबाबतच पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT