DRDO Pradeep Kurulkar :
DRDO Pradeep Kurulkar : Sarkarnama
पुणे

ATS Arrests Pradeep Kurulkar: कुरुलकरांच्या भोवती एटीएसने फास आवळला; लॅपटॉप अन् मोबाईलचे होणार तांत्रिक विश्लेषण

सरकारनामा ब्यूरो

DRDO News: पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्यांना अटक केली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून कुरुलकर हे पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.

या प्रकरणी डॉ.प्रदीप कुरुलकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुरुलकरांना 'एटीएस'ने अटक केली. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना 9 मेपर्यंत 'एटीएस'च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

'एटीएस'ने प्रदीप कुरुलकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले असून 'एटीएस'ने पुढील तपासाचा वेग वाढवला आहे.

कुरुलकर हे सप्टेंबर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांनी कुरुलकरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. कुरुलकरांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले? ते अजून कुणा-कुणाच्या संपर्कात होते? त्यांनी पाकिस्तानी हेरांना नेमकं काय माहिती दिली? यासंदर्भात त्यांची 'एटीएस'कडून कसून चौकशी करण्यात येत आहे. याबरोबरच त्यांच्या लॅपटॉप आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT