Sunil Shelke Latest Marathi News, NCP News
Sunil Shelke Latest Marathi News, NCP News Sarkarnama
पुणे

सुनिल अण्णांनी भाजपला केलं रिकामं; एकमेव नगरसेविकेचा ४ महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश

उत्तम कुटे: सरकारनामा

(NCP latest News)

पिंपरी : नवनिर्मित श्री क्षेत्र देहू (जि.पुणे) नगरपंचायतीतील भाजपच्या (BJP) पहिल्या आणि एकमेव नगरसेविका पूजा काळोखे यांनी (काल) गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यामुळे देहूत भाजपची पाटी कोरी झाली आहे. तर,दुसरीकडे राष्ट्रवादीचे १७-० असे निर्विवाद बहुमत झाले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या काळोखे या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. यावेळी आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी त्यांचे स्वागत केले. (Sunil Shelke Latest News)

राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या आढावा बैठकीत वडगाव मावळमध्ये काळोखे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत कमळ सोडून हातात घड्याळ बांधले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने आपल्याला सांभाळून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. मोठ्या भावासारखे अण्णांनी (आ.शेळके) पाठीशी रहावे, असेही त्या म्हणाल्या. दमदार आमदार असलेल्या अण्णांच्या कामाने प्रभावित होऊनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झालेल्या देहूत जानेवारीत निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीला बहूमत मिळाले. त्यांचे १४, दोन अपक्ष आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला. नंतर दोन्ही अपक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तर,काल भाजपच्या काळोखेही राष्ट्रवादीत आल्याने देहूत राष्ट्रवादीचे बळ १७-० असे झाले. पहिल्याच देहू नगरपंचायतीत महिलाराज अवतरलेले आहे. १७ पैकी ११ नगरसेवक महिला आहेत. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षही महिलाच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT