Shivsena Leader Nilam Gorhe Sarkarnama
पुणे

पायऱ्यांवरील गोंधळ : आमदार वर्तणूक नियमावली समितीचा अहवाल एका महिन्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसेच सर्वपक्षांच्या गटनेत्यांचा या समितीत समावेश आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आमदारांच्या वर्तणूक नियमावलीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने(State Government) नेमलेल्या समितीचा अहवाल पुढील एका महिन्यांत येईल, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज पुण्यात दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वपक्षांच्या गटनेत्यांचा या समितीत समावेश आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या समितीचे अध्यक्ष तर, मी सहअध्यक्ष आहे, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘ लोकशाहीत लोकप्रतिनिधीला आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, विधीमंडळाच्या आवारात, सभागृहात त्याचे वर्तन कसे असावे, या बाबत नियमावली आहे. त्याचे उल्लंघन घालून कोणी आवाज काढतात, तर कोणी शीर्षासन घालतात, चुकीच्या पद्धतीने वागतात. या नियंत्रण आणण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात येणार आहे.’’

पक्षांतर, स्वतंत्र गट आदी घडामोडी घडल्या तरी, लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांमधील सलोखा कायम राहिला, या बद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. पायऱ्यांवरील आंदोलन मात्र, त्याला अपवाद ठरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकार नवे असल्यामुळे आणि अधिवेशनादरम्यानच मंत्र्यांना खात्याचा कार्यभार मिळाला. त्यामुळे अनेकदा प्रश्नांना उत्तरे देताना संबंधित मंत्र्यांची तारांबळ उडाली. मात्र, आमदारांनी त्यासाठी सहकार्य केले, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT