Ajit Pawar
Ajit Pawar  sarkarnama
पुणे

आमच्यावर टीका झाली तरी तुमचा तोल ढळू देऊ नका ; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

सरकारनामा ब्युरो

पुणे : "आज काल कार्यकर्त्यांनी पद घेतलं की लगेच फोटो काढतात, मागण्या करायला लागतात,आधी अभ्यास करा, मग मागण्या करा. कार्यकर्ते कसे असावे, यासाठी या निष्ठावंताना बघा," असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कार्यकर्त्यांना दिला. "आमच्यावर कुणावर टीका झाली तरी तुम्ही तुमचा तोल जाऊ देऊ नका," असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज पुण्यात 'शिलेदार निष्ठेचे' हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कधीही लाभाचा पद न भुषविलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

अजित पवार म्हणाले, "पदावर असलो नसलो तरी पाय जमिनीवर असायला हवे. आमच्यावर कुणावर टीका झाली तर तुम्ही तुमचा तोल जाऊ देऊ नका. पवार साहेबांवर अनेक वेळा खालच्या पातळीवर टीका झाल्या. दाऊदशी सबंध असल्याचे आरोप झाले, भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. पण साहेबांनी तोल ढळू दिला नाही. बोलता बोलता जीभ घसरू देऊ नका. मागे कुणीतरी कुठल्या नटीने पवार साहेबांवर टीका केली होती, पण कायदा श्रेष्ठ आहे,"

"आघाडी असली तरीही आपण आपली ताकद वाढवली पाहिजे.पद प्रतिष्ठा पैसा मिळुनही काही जण पक्ष सोडून जातात, काही जण तर सरड्या सारखे रंग बदलतात. माझ्या एवढं कामं कुणीच करू शकणार नाही हा माझा दावा आहे. पण माझ्या कामातून कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे," असे पवार म्हणाले. "पक्षाच्या वर्धापन दिनाचा भव्य कार्यक्रम दिल्लीत घेतला जाणार आहे, तारीख लवकरच कळविली जाईल," असे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT