पुणे : कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तरीही कसब्यात सुमारे ३० वर्षांचा विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कसबा पेठेतील रखडलेली विकासकामे येत्या पाच वर्षांत आपण करणार असल्याची ग्वाही आमदार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना दिली.
महाविकास आघाडी इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कसब्यात पदयात्रा सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या पदयात्रेच्या वेळी मतदारांशी संवाद साधताना धंगेकर यांनी ही ग्वाही दिली.
गवरी आळी, भाजी मार्केट गुरुवार पेठ येथून धंगेकर यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा बंदिवान मारुती, कस्तुरी चौक, श्रमदान मारुती मित्र मंडळ, मीठ गंज चौकी, वाळवेकर निवास, कृष्णा हट्टी चौक, भांडी बाजार, जैन मंदिर, गाडीखाना काची आळी, रविवार पेठ, कस्तुरी चौक या भागातून काढण्यात आली. ठिकठिकाणच्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांना पाठिंबा दिला.
या पदयात्रेत बाळासाहेब मारणे, वीरेंद्र किराड, राजन काची, मिलिंद काची, सौरभ अमराळे, राजेंद्र कंगळे, रूपेश पवार, अजय पैठणकर, सुभाष थोरवे, कान्होजी जेधे, मंजिरी कोठुळे, संगीता निंबाळकर, वनीता राऊत, प्रिया देसाई इत्यादी सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.