Narendra Modi News Sarkarnama
पुणे

PM Narendra Modi Speech: महाराष्ट्राचा विकास म्हणजेच भारताचा विकास; पंतप्रधान मोदींनी फुंकले निवडणुकींचे रणशिंग

PM Modi Inaugurate Pune Metro: महाराष्ट्राचा विकास होईल, तेव्हाच भारताचा देश विकास होईल.

सरकारनामा ब्यूरो

PM Narendra Modi to Visit Pune : महाराष्ट्राचा विकास होईल, तेव्हाच भारताचा देश विकास होईल. भारताच्या विकासातून महाराष्ट्राच्या वाट्याला सारे काही येणार असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ फोडल्याचे मानले जात आहे. तरुणांना सामावून घेत, त्यांना रोजगार देण्याची क्षमता पुणे शहरात असून, त्यामुळेच पुण्यासारख्या शहरातील लोकांचे जीवनमान उंचावत असल्याकडे लक्ष वेधून मोदींनी पुणेकरांना (Pune) पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

लोकमान्य टिळक पुरस्कारानंतर पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते मेट्रोसह इतर प्रकल्पांचे उदघाटन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरांचे महत्त्व सांगून, केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारलेल्या योजना पुणेकरांपुढे मांडल्या.

मोदी म्हणाले, ''शहरातील मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुण्यातही चांगल्या सुविधा देऊन लोकांना बदलेल्या विश्‍वात नेले जात आहे. पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो गरजेची आहे. त्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. याआधी देशातील पाच शहरात मेट्रो होती. आजघडीला २० शहरात ही सेवा आहे. देशात आठशे किलोमीटर लांबीची मेट्रो आहे.''

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम सुरू आहे. लोकांवर सरकार विश्वास ठेवत आहे. त्यामुळे लोक देशाच्या विकासासाठी पुढे येत आहेत. लोकांचाही सर्वाधिक विश्वास भारत सरकारवर आहे. जग देखिल भारताकडे आशेने बघत आहे. एकिकडे महाराष्ट्राचा विकास होत आहे. पण दुसरीकडे कर्नाटक (Karnataka) पाहतो आहे. ज्याप्रकारे घोषणाबाजी करून सरकार आणले त्याच आपण पाहतोय. तिकडे विकास होत नाही आहे, असा आरोपही मोदींनी केला. कर्नाटमध्ये तरुणांचा आणि नागरिकांचा विकास करण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत, असे सरकार सांगत आहे. तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे मोदींनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT