Devendra Fadnavis : Maharashtra Kesari
Devendra Fadnavis : Maharashtra Kesari Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : कुस्तीपटूंसाठी 'अच्छे दिन' : फडणवीसांनी लावला घोषणांचा सपाटा!

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Kesari : पुण्यात आज महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) अंतिम सामन्याचा थरार रंगलेला दिसून आला. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थिती होते. यावेळी फडणवीस यांनी सामन्याआधीच फडणवीस यांनी मोठ्या घोषणांची खैरात केली.

फडणवीस म्हणाले, "मुरलीधर मोहोळ आणि रामदास तडस यांनी मागणी केली आहे. हे खरंच आहे की, आपण कुस्तीपटूंना अत्यल्प मानधन देतो. म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी आणि क्रिडामंत्र्यांशी चर्चा केली. आपल्या राज्यामध्ये ऑलिंपिक व जागतिक पातळीवर जे कुस्तीपटू खेळतात त्यांना केवळ सहा हजार रूपये आपण मानधन देतो, आता ते मानधन २०००० रूपये करण्याची घोषणा करूया. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, रूस्तम-ए-हिंद यांचं मानधन ४००० रूपयांवरून १५००० रूपयांपर्यंत वाढवण्यात येईल."

"यासोबतच कुस्तीतले अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना त्यांचं मानधन ६००० रूपयांवरून २०००० रूपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध खेळाडूंचे मानधन २५०० रूपयांवरून ७५०० रूपये मानधन देण्यात येईल. जेवढे कुस्तीपटू आहेत, त्यांचे मानधन तीन पटीने वाढवणय्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे," असेही फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, "हे मानधन वाढवण्यामागची आमची भावना एवढीच आहे की, कुस्तीमध्ये मेहनत आणि खुराक दोन्हींची गरज असते. या दोन्ही गोष्टींसाठी पैसाही खर्च होतो. सामान्या घरचे खेळाडू मेहनीतीने कुस्तीवर होतात. त्यांना मदत सरकारच्या वतीने मदत मिळाली पाहिजे. म्हणून मानधन वाढीचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. "

पाठीमागच्या काळात कुस्तीच्या तीन खेळाडूंना थेट डिवायएसपीची नोकरी दिली. अशाच प्रकारे आमच्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी असेल, संधी असेल सरकारच्या वतीने निश्चितपणे देण्यात येईल," असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, शिवराज राक्षे हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महेंद्र गायकवाड याला अंतिम सामन्यात चितपट करत राक्षेने मानाची चांदीची गदा पटकावली व महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT