Pune Metro Shivajinagar to Hinjawadi  Sarkarnama
पुणे

Pune Metro : प्रतीक्षा संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 'मे महिन्यात...'

Devendra Fadnavis Shivajinagar–Hinjewadi Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्यात या मेट्रो मार्गावर मेट्रो धावणार आहे.

Sudesh Mitkar

Devendra Fadnavis News : बहुप्रतिक्षीत शिवाजीनगर ते मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. हा मार्ग कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी त्यांनी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग कधी सुरू होणार याबाबत मोठी अपडेट दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, 'देशात पीपीपी तत्त्वावर तयार होणारी पहिली मेट्रो जी शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान धावणार आहे. या मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन मे मध्ये 11 किलोमीटर मेट्रो मार्ग खुला होणार असून उर्वरित 12 किलोमीटर मेट्रो मार्गचे उद्घाटन जुलैमध्ये करण्याचे नियोजन आहे.'

पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

पुणे मेट्रो भवन अत्याधुनिक सुविधा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT