DCM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Baramati Election Sabha: CM फडणवीसांची तोफ सात वर्षांनंतर बारामतीत धडाडली; अजितदादांच्या अपघाती निधनाबाबत केलं मोठं विधानं

Sunetra Pawar Baramati By Election News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभेत तडाखेबंद भाषण ठोकलं. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीत भाषण केलं होतं.

Deepak Kulkarni

Baramati News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होत आहे. भाजप,राष्ट्रवादीकडून बिनविरोधसाठी जोरदार प्रयत्न होऊनही 22 जणांचे अर्ज कायम राहिल्यानं याठिकाणी येत्या 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीतील राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभा बारामतीत पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सांगता सभेत तडाखेबंद भाषण ठोकलं. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीत भाषण केलं होतं. यानंतर तब्बल 7 वर्षांनंतर फडणवीसांनी बारामतीत केलेल्या आपल्या भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी फडणवीसांनी अजितदादांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध,कामाचा आवाका, प्रशासनावरचा वचक, कामकाजातील शिस्तप्रियता यांसह अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मंत्रिमंडळातील कामाच्या क्षमतेचंही विशेष कौतुक केलं. तसेच यावेळी त्यांनी अजितदादांच्या अपघाताच्या मुद्द्यांवरुन पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

बारामती येथील सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना या पोटनिवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन करतानाच असं जर आपण नाही केलं, तर आपण करंटे ठरू,असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.या सभेत त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा मला काल फोन आला होता. त्यांनी मला आमचा सुनेत्रा पवारांना पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसेच आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनाही विनंती केली, त्यांनीही ती विनंती मान्य केली, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघाता संदर्भासह अनेक मोठी विधानं केली आहेत.यावेळी त्यांनी अजितदादांसोबत काम करण्याचा आनंद वेगळा होता.त्यांचा स्वभाव रोखठोक होता.सरकारी कामंही सर्वोत्तम दिसले पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं.राज्याला अजितदादांनी लावलेली आर्थिक शिस्त महत्वाची असल्याचंही म्हटलं.

फडणवीसांच्या भाषणातील दहा मोठी विधानं:

1: माझ्यापैकी कुणीही बारामतीत सभा घेण्यासाठी आलं नसतं, तरी बारामतीकरांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून दिलं असतं.

2: मागील दोन अडीच महिन्यांत वहिनींच काम पाहिलं,त्यानंतर मी दाव्याने सांगतो की, अजितदादांची सर्व स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

3: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार होते.त्यांना राज्याला कुठं न्यायचंय, याची कल्पना असणारं नेतृत्व म्हणजे अजित पवार होतं.असं नेतृत्व तयार व्हायला खूप वाट पाहावी लागते.

4: अजित पवारांनी राज्याचे 11 अर्थसंकल्प मांडले.त्यांनी विकसित महाराष्ट्राची पायवाट होण्याचं काम केलं. दादा जाणं म्हणजे सुनेत्रा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमचंच नव्हे,तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे.

5: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.मात्र,या अपघाताचं सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

6: निवडणुकीची 23 तारीख दादांना श्रद्धांजली देण्याची तारीख आहे,मतदानरूपी आदरांजली देण्याची बारामतीकरांना संधी आहे.सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मतांनी विजयी करा.

7: बारामतीची आजची सांगता सभा म्हणजे अजितदादांच्या स्मृतीचा हा यज्ञ सुरू आहे,या यज्ञात आपली आहुती टाकली नाही, तर मनात काहीतरी हुर हुर राहिली असती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT