Devendra Fadnavis PMRDA  sarkarnama
पुणे

PMRDA DP  Cancel : पुणे महापालिकेतील 23 गावांच्या 'डीपी'वर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 40 कोटींचा चुराडा, पण हाती भोपळा!

Devendra Fadnavis PMRDA : वादग्रस्त ठरलेला पीएमआरडीएचा डीपी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

Roshan More

PMRDA DP News : आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा (डीपी) रद्द केला आहे. सरकारने त्याविषयी अधिसूचना देखील काढली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा डीपी देखील रद्द झाला आहे. या निर्णयामुळे आता 23 गावांचा डीपी तयार करण्याचा अधिकारी पुणे महापालिकेला देणार का? याची उत्सुकता आहे.

पीएमआरडीने डीपी तयार करण्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये सिंगापूरच्या कंपनीला दिले होते. त्यामुळे आता हा डीपीच रद्द केल्याने सर्व खर्च पाण्यात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, हा डीपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पुणे महापालिकेकडून 23 गावांचा डीपी तयार करण्याची तयारी दाखवत तसे सरकारला पत्र देखील सरकारला लिहिले होते.

प्राधिकरणाने तयार केलेल्या डीपीवर तब्बल 62 हजार हरकती आल्या होत्या. हा आराखडता तयार केला जात असतानाच पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे या गावांचा डीपी कोण तयार करणार यावरू वाद देखील झाला होता.

पीएमआरडीचा डीपी हा वादग्रस्त ठरला होता. त्याच्या विरोधात काही संस्था या न्यायालयात गेल्या होत्या. तर, पुणे भाजपच्या नेत्यांकडून 23 गावे पुणे महापालिकेत आल्याने त्यांचा डीपी तयार करण्याचा अधिकार हा पुणे महापालिकेचा असल्याचे म्हटले होते. मात्र, तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान, मार्च महिन्यात 2023 मध्ये झालेल्या डीपीवर झालेल्या सुनावणीत कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती.

दोन महापालिका, सात नगर परिषद

पीएमआरडीएची स्थापना 2015 मध्ये करण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सात नगरपरिषदा तसेच 842 गावांचा समावेश त्यामध्ये होता. आता बारामती तालुक्याचा देखील यामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT