DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : 'विरोधक अमेरिकेत जाऊन देखील उद्घाटन करतील' ; देवेंद्र फडणवीसांचा टोला!

Sudesh Mitkar

Devendra Fadnavis on Pune Metro : मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या उद्घाटनावरून जोरदार राजकारण रंगले आहे. सुरुवातीला एकाच मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली.

त्यानंतर पावसाचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मेट्रोचे प्रतिकात्मक उद्घाटन देखील करण्यात आलं. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना 'विरोधक अमेरिकेत जाऊन देखील उद्घाटन करतील.' असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज(रविवार) ऑनलाईन स्वरूपात विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेला कार्यक्रम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकाला भेट दिली त्यावेळी त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सिविल कोर्टे ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील आपण केले आहे. त्यामुळे आता पुणे शहरामध्ये 32 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे.

'2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर रेकॉर्ड वेळेमध्ये पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला. आज ज्या स्वारगेट स्टेशनचं लोकार्पण करण्यात आलं ते एक इंजीनियरिंग मर्व्हल आहे. जमिनीच्या सहा मजले खाली हे स्टेशन उभारण्यात आलं आहे. सर्व वाहतूक व्यवस्थांच इंटिग्रेशन या स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठे हे स्टेशन असणार आहे.'

दोन दिवसापूर्वी विरोधकांकडून आंदोलन करत प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलं होतं त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक अमेरिकेत जाऊन देखील उद्घाटन करतील. त्यांना पुणेकरांचं काही देणं घेणं पडलेलं नाही. पुणेकरांचं त्यांना देणे घेणं असतं तर सर्वप्रथम 2008 साली पुण्याला मेट्रो देण्याचा प्रस्ताव आला होता. ते साधा एक दगडही टाकू शकले नाही अथवा त्यांनी एक पिलर देखील उभा केला नाही. त्यांनी याबाबत टीका करणे हे हास्यास्पद आहे. आम्ही काही करू शकलो नाही आणि एवढ्या कमी वेळात त्यांनी हे करून दाखवलं याचं फस्ट्रेशन विरोधकांच्या मनात असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मोदींचा(PM Modi) दौरा हा राजकीय कार्यक्रम नव्हता तर तो सरकारी कार्यक्रम होता. पंतप्रधानाच्या सभेला 50 हजार लोक येतात ही कोपऱ्यातील सभा नव्हती. 50 हजार लोक सभेला येणार असताना, पाऊस सुरू असताना, रेड अलर्ट दिला आणि शाळांना सुट्टी असताना अशा परिस्थितीत जर पंतप्रधान इथे आले असते आणि लोकांची असुविधा झाली असली तर ते अत्यंत चुकीचं झालं असतं, त्यामुळे पंतप्रधानांनी मोठं मन दाखवत सांगितलं की मी लोकांना अडचणीत टाकणार नाही. मात्र विरोधक राजकारण करतात कारण त्यांना दुसरा धंदाच नाहीये. अशा शब्दांत फडणवीसांनी सुनावलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT