Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis News : आपला फॉर्म्युला म्हणजे मोदीजींची कार्यशैली; कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन..

सरकारनामा ब्यूरो

भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आज पुणे इथे भरली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन फडणवीसांनी केले. तसेच, यावेळी त्यांनी प्रसंगी पक्षासाठी त्याग करण्याची भावना देखील बोलून दाखवली.

देवेंद्र फडणवीस यांचे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोरच केलेले, वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनवण्याचा आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगत होती. यानंतर ही नाराजी अनेक भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होती. स्वत: फडणवीस सरकारच्या बाहेर राहून, काम करण्यास अधिक उत्सुक होते. मात्र त्यांना पक्षादेशामुळे उपमुख्यमंत्री व्हावे लागले. त्यावेळीही फडणवीसांच्या त्यागाची चर्चा रंगली होती.

आज जे.पी. नड्डा यांच्यासमोर फडणवीस यांनी आक्रमक आवेशात भाषण केले. यावेळी सी. टी. रवी, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुनील देवघर, विजया रहाटकर अनेक नेते उपस्थित होते.

फडणवीस काय म्हणाले?

"कसलीही लालसा, लोभ न बाळगता भाजप कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करण्याची तयारी दर्शवायला हवी. तसेच, पक्षासाठी आपल्याला त्याग करायचा आहे. तुम्ही म्हणालात तर पक्षासाठी कसलाही त्याग करायला तयार आहे.

कोणतंहीपद सोडायलाही तयार आहे, इतकंच काय वर्षभरासाठी मी घरही सोडायला तयार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.आपला फॉर्म्युला काय तर मोदींजींची कार्यपद्धती. आपला नरेटिव्ह हा सर्वसामान्यांच्या विकासाचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

2023 या वर्षातील शेवटचे 6 महिने, आणि 2024 चे पहिले 6 महिने, हेच आपले ध्येय पाहिजे. कार्यकर्त्यांनी पक्षकार्यात स्वत:लाझोकून द्यायला हवे," असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT