Dilip Mohite Patil Vs Sanjay Raut.jpg Sarkarnama
पुणे

Dilip Mohite Patil Vs Shivsena : मोहिते पाटलांविरुद्ध शिवसेनेकडे तगडा चेहरा? राऊत 'खेड'चा वचपा काढणार, 'तो' शब्द खरा करणार?

Shivsena UBT News : महाविकास आघाडी सरकार असतानाच खेड - आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि ठाकरे गटात जोरदार खटके उडाले होते. तेव्हाच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुढच्या वेळी येथे शिवसेनेचा आमदार असेल असं ठणकावलं होतं.

Deepak Kulkarni

Pune News : एकेकाळी पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. लोकसभेला शिरूर, मावळ तर विधानसभेच्या पुरंदर, जुन्नर,खेड,हडपसर,पिंपरीच्या जागा शिवसेनेकडे होत्या. पण 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करतानाच शिवसेनेची मात्र पिछेहाट झाली.

पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आता राज्यासह पुणे जिल्ह्यातही राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून खेडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटलांविरोधात (Dilip Mohite Patil) आता शिवसेना ठाकरे गटाला सक्षम पर्याय मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत एकत्र असूनही खेड पंचायत समितीत नगरसेवक फोडून शिवसेनेची सत्ता उलथवून टाकणाऱ्या आमदार मोहिते पाटलांच्या पराभवाचा विडा त्याचक्षणी खासदार संजय राऊतांनी उचलला होता. आता तो शब्द करण्यासाठी खेड आळंदी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं चाचपणी सुरू केली आहे.

आत्तापर्यंत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली आहे. पण 2019 च्या निवडणुकीत तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे अजित पवार गटात आहे.

तिथे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हेंनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेल्या महाविकास आघाडी विशेषत:शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा पुणे जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून आहे.

दिलीप मोहिते पाटलांविरोधात तगडा चेहरा

महाविकास आघाडी सरकार आणि राष्टवादी काँग्रेस एकसंध असतानाही खेड - आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात आणि ठाकरे गटात जोरदार खटके उडाले होते. तेव्हाच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुढच्या वेळी येथे शिवसेनेचा आमदार असेल असं ठणकावलं होतं. त्याच वक्तव्याचा आधार घेऊन आता ठाकरे गटाला तिथे राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तगडा चेहरा मिळाला असल्याची चर्चा आहे.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात प्रबळ दावेदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे यांचं नाव सर्वात पुढे आहेत. त्यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.यात काळे यांनी मिशन विधानसभा डोळ्यासमोर ठेवून यापूर्वीपासूनच मतदारसंघात 'मतपेरणी' सुरू केली आहे.काळे यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क ही आहे.त्यामुळे सध्यातरी येथे दिलीप मोहिते यांच्याविरोधात बाबाजी काळे हेच प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि राष्टवादी काँग्रेस एकसंध असतानाही खेड - आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात आणि ठाकरे गटात जोरदार खटके उडाले होते. तेव्हाच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुढच्या वेळी येथे शिवसेनेचा आमदार असेल असं ठणकावलं होतं.त्याच वक्तव्याचा आधार घेऊन आता ठाकरे गटाला तिथे राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तगडा चेहरा मिळाला असल्याची चर्चा आहे.

...म्हणून ठाकरेंना मोहिते पाटलांना पाडायचंच!

खेड पंचायत समितीत शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तेथील सेनेची सत्ता उलथवून टाकली होती.यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरुद्ध अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर स्वत:खेडमध्ये जाऊन दिलीप मोहिते पाटील यांना येत्या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार बोलून दाखवला होता.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांना करावा, अन्यथा शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच राऊत यांनी दिला होता. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू.

मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचा आमदार निवडून येईल, असा इशाराच राऊत यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT