Dilip Walse-Patil  latest news |
Dilip Walse-Patil latest news | 
पुणे

तर रस्त्यावर उतरणार..; वळसे-पाटलांची राज्य सरकारला इशारा

रोहिदास गाडगे

Dilip Walse-Patil पुरंदर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात होणा-या विमानतळ बाबत आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की,सरकार बदललं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगून टाकल जे होणार नाही त्याची चर्चा कशाला?.. ठीक आहे. रकार तुमचं आहे. पण लोकांच मतही विचारात घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीने पुरंदर विमानतळासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते, पण केवळ सरकार बदललं म्हणून तो निर्णय बदलणं हे राज्याच्या हिताच नाही. अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दिली आहे.

तसेच, गेल्या दहा वर्षांपासून एवढे प्रयत्न करुन, आराखडे तयार केल्यानंतर भूसंपादन करुन जर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात सुधारणा करणार असतील, किंवा रद्द करणार असतील किंवा रस्ता आणि रेल्वे असे दुहेरी करणार असतील तर त्याला आणखी पाच-दहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. एकप्रकारे हा स्थानिक लोकांची प्रगती थांबवण्यासाठीच हा निर्णय घेतला काय, असाही प्रश्न आहे? पण असा निर्णय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.

याचवेळी त्यांनी राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आश्वानसांवरही ताशेरे ओढले आहेत. ''दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टी ने शेतकरी अडचणीत असून पूर्ण मदत नाही. मात्र इतर निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकार उभं राहिलं पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करत वळसे पाटील व्यक्त केली आहे.

कॉंग्रेस राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की,सद्याच्या सरकारच्या विरोधात गावपातळीवर उतरून विरोध करण्याची गरज आहे .राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय.या यात्रेचं कव्हरेज कोणतंही माध्यम दाखवत नाही.मात्र या यात्रेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यावर केंद्र आणि राज्यातील प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT