Dimbhe Dam Water Issue
Dimbhe Dam Water Issue Sarkarnama
पुणे

Dimbhe Dam Water Issue : डिंभे धरणाचे पाणी पळविल्यास सर्वप्रथम मी अन्‌ आमदार बेनके जेलमध्ये जाऊ : दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर हे तीन तालुके एकेकाळी दुष्काळी तालुके म्हणूनच ओळखले जात होते. आमच्या जुन्या पिढ्यांनी फार यातना भोगलेल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचे (डिंभे धरण) काम मार्गी लावले. त्यानंतर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले असतानाच जाणीवपूर्वक डिंभे धरणाचे पाणी पळविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास माझ्यासह जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) सर्वात प्रथम कारागृहात जातील, असा इशारा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला. (Dilip walse Patil warns if Dimbhe dam water is diverted, I and MLA Benke will go to jail first)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत वळसे पाटील Dilip walse Patil बोलत होते. यावेळी आमदार बेनके उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणासाठी आदिवासी बांधवांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या. घोड, मीना, कुकडी नदीवर सुमारे ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. हे बंधारे सातत्याने भरून घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला.

विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने डिंभे धरणाचे पाणी पळवण्याचा विचार चालवलेला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे. मी व बेनके आम्ही लढ्यामध्ये अग्रभागी असणार आहोत, त्यासाठी होणाऱ्या लढ्यात सर्व शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला पाहिजे; अन्यथा आपल्या वाट्याच पाणी पळवल जाईल.”

आंबेगाव,जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवणाऱ्याच्या विरोधात गावोगावी शेतकरी वर्गात जनजागृती करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.

हिंगे म्हणाले “विविध संस्थांवर पदे मिळालेल्या कार्यकर्त्यांनी पदे ही शोभेसाठी नाहीत. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा. जनतेच्या सुख दुखामध्ये सहभागी व्हा. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी वेळ द्या. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करा. नगर येथे होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.”

या वेळी बेनके, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे, गणपतराव इंदोरे, सचिन भोर, सुभाषराव मोरमारे, सुषमा शिंदे, संजय गवारी, बाजार समितीचे संचालक निलेश थोरात, रत्ना गाडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT