Bala Bhegade - Sunil Shelke Latest News Sarkarnama
पुणे

Shelke Vs Bhegade : शेळके-भेगडेंतील दिलजमाई नाहीच ; 'हे' आहे कारण...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : मावळ लोकसभेतून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आगामी लोकसभेसाठी पुन्हा आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनीही पक्ष लढ म्हटला,तर तयारीत आहे, असे सोमवारी (ता.२७) सांगितले.

त्यानंतर मावळातून लोकसभेला भाजपचे बाळा भेगडे (Bala Bhegde) आणि विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित) पवार गट) विद्यमान आमदार सुनील शेळके अशी मामा-भाच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा सुरु रंगली.मात्र, ती झाली असे सांगणाऱ्यांनी ती मानावी का,या शब्दांत शेळकेंनी (भाचे) मंगळवारी (ता.२८) तिचे खंडन केले. त्यातून भेगडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.

युतीधर्म पाळायची जबाबदारी फक्त राष्ट्रवादीची नसून इतरांनीही (भाजप,शिवसेना) तो पाळावा,अन्यथा तुमचा मार्ग मोकळा, आमचा मार्ग मोकळा,असे सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) यावेळी रोखठोकपणे सुनावले.भाजपचे मावळ विधानसभा प्रचारप्रमुख आणि माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी काल मावळातील खासदार हा महायुतीच्या विचाराचा,तर आमदार,मात्र भाजपचाच असेल, असे वक्तव्य केलं होतं.

त्याचाही समाचार कोण रविंद्र भेगडे अशी विचारणा करत शेळकेंनी घेतला. त्याचवेळी लोकसभेला भेगडे आणि विधानसभेला शेळके हे मी कोण ठरवणार असे ते म्हणाले. तो माझा अधिकार नसून ते ठरविण्याचे काम वरिष्ठांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) -जरांगे वादात कोण योग्य यावर भाष्य करणे शेळकेंनी टाळले. ते दोघेही आपल्या समाजाची बाजू मांडत आहेत,असे ते म्हणाले.मराठा समाजासाठी मंत्रालयात मी आंदोलन केले, रस्त्यावर उतरलो,त्यात गैर काय,अशी विचारणा त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप लांबल्या असल्या,तरी ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्यावरही त्यांनी मत व्यक्त केले नाही.त्याचवेळी नवे कारभारी आले पाहिजे,असेही ते म्हणाले.

गेल्या ५८ दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा प्रश्न आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे शेळकेंनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT