Ajit Pawar sarkarnama
पुणे

काठीचा उपयोग नीट करा; अन्यथा तुम्हाला नीट करण्याची वेळ आमच्यावर येईल : अजितदादांचा इशारा

बारामती तालुक्यात (Baramati) ३३ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन

कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव : पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेमध्ये लोकशाही संकटात सापडल्याचे चित्र आहे. भारतात लोकशाही अधिक बळकट होताना दिसते. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला कायदा आणि त्या कायद्याचे रक्षक म्हणून पोलिस आहोरात्र कार्यरत असतो. पोलिसांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकाराने निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार प्रशस्त पोलिस वसाहतीसह कार्यालये उभारणी, वाहने खरेदी आणि पुरेशी पोलिस (Police) भरती करण्याचा धोराणात्मक निर्णय घेतला आहे, असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केली.

तसेच त्यांनी १४२ कोटी रुपये खर्च होणारे बारामती (Baramati)-बऱ्हापूरचे पोलिस उपमुख्यालय वैभवात भर घालणारे ठरणार असल्याचेही सांगितले. बारामती तालुका पोलिस ठाणे अंतर्गत माळेगाव येथे आज ग्रामसुरक्षा दल स्थापना व त्यांना किट वाटप अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधिक्षक डॅा. अभिनव देखमुख (Abhinav Dekhmukh), माळेगावचे बाळासाहेब तावरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, राज्यात आर. आर. पाटील (R. R. Patil) यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद सांभाळले. पोलिसांच्या समस्या सोडविण्यापासून ते पोलिस दल सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय त्याकाळी घेतले.

शिवाय त्यांची तंटामुक्त गाव योजना खूपच आकर्षक ठरली, असे सांगून पवार म्हणाले, ''देशात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने मनुष्यबळचा प्रश्न पुढे येतो. अवश्यकतेनुसार महाराष्ट्र सरकार पोलिस भरती करीत आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार करता पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा अद्यापही रिक्त आहेत. अशा प्रतिकूल स्थितीत पुरेसे मनुष्यबळ वाढविण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची मदत महत्वपुर्ण ठरते. तसेच पोलिसांना अपातकालिन गोष्टींमध्येही तातडीने मदतीला ग्रामसुरक्षा दल मिळते. त्या उद्देशानेच ग्राम सुरक्षा दलातील जवानांना प्रोत्साहनपर लाटीकाटी, शिट्टी, पोषाक आदी साहित्य मोफत देण्यात आले आहे.

''बारामतीमधील ३३ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन झाले आहेत. या दलातील जवानांना देण्यात आलेल्या किटसाठी शरयु फाऊंडेशन, तसेच उद्योजक रविंद्र काळे, उद्योजक मनोज तुपे आदींनी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी संभाजी होळकर, विश्वास देवकाते, किरण गुजर, सचिन सातव, रविंद्र काळे, डी. एन. जगताप, अनिल काटे, मनोज तुपे, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, डीवायएसपी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक महेश ढवाण, राहुल घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. अनिल धुमाळ, प्रतिक्षा पाटील यांनी केले.

काठीचा उपयोग निट करा...!

ग्राम सुरक्षा दलातील जवानांचे कार्य हे मदतीचे आहे. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यामुळे ग्राम सुरक्षा दलाने त्यांना दिलेल्या अधिकाराचा आणि काठीचा उपयोग नीट करावा. अन्यथा तुम्हालाच नीट करण्याची वेळ आमच्यावर येऊ देवू नका, असा सल्ला जवानांना देत अजित पवार यांनी उपस्थितांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT