Devendra Fadanvis sarkarnama
पुणे

PMC: पुणे महापालिका विभाजनाबाबत फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले..

Devendra Fadnavis : पुण्याचे दोन भाग होणार नाही, हा नवीन वाद कशाला काढता, आपल्याला विकासाकडे जायचं आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी केलेल्या विधानामुळे सध्या चर्चा आहे. यावर भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

"पुणे महापालिकेचे दोन भाग करायला हवे," असे पाटील म्हणाले. "पुणे महापालिकेचे क्षेत्र वाढत आहे. आधी यामध्ये 11 गाव समाविष्ट केली होती. त्यानंतर पुन्हा 23 गाव समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील कोणत्याही महापालिकेपेक्षा मोठे झाले आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना सोयी - सुविधा द्यायच्या असतील, तर पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची गरज आहे," असे पाटील म्हणाले होते.

फडणवीस म्हणाले, "पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत राज्य सरकार पुढे भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो, आज तरी कुठलाही प्रस्ताव नाही. पुण्याचे दोन भाग होणार नाही, हा नवीन वाद कशाला काढता, आपल्याला विकासाकडे जायचं आहे. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही,"

पाटील म्हणाले होते की, पुणे हे सुरक्षित शहर आहे. त्यामुळे जितके युनिट लहान तितका त्यांचा विकास लवकर व सहज होतो. त्यामुळे पुणे महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे.पुण्याचे दोन भाग करण्याची माझी राजकीय भूमिका नाही. मात्र विकास आणि बाकी समस्या बघितल्या तर दोन भाग व्हायला हवेत, गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत. याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा आहे. याबाबत फडणवीसांनी आज स्पष्टीकरण दिले. "मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही," असे ते म्हणाले.

"तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का ? का मला पुण्यातून लोकसभा लढविण्याबाबत विचारतात," असे त्यांनी माध्यमांना सांगितले. पुण्यात ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT