BRT Pune, Vandana Chavan Latest News Sarkarnama
पुणे

पुण्यातील ‘BRT’ बंद करू नका ; राष्ट्रवादीच्या खासदारांची आयुक्तांकडे मागणी...

BRT Pune : वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी बीआरटी बंद करण्याची सूचना केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे: पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्‍वाचे स्थान असलेली बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (BRT) बंद करू नये. ही व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका (PMC) आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे शुक्रवारी (ता.२५ नोव्हेंबर) केली आहे. (BRT Pune, Vandana Chavan Latest News)

पुण्याच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी बीआरटी बंद करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात चव्हाण यांनी म्हटले की, ‘पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात सध्या कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. पुण्यातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे हा एकमेव उपाय आहे.लोकांना खाजगी वाहनांपासून दूर राहण्यास आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी,आपल्याला कार्यक्षम आणि शाश्वत, एकात्मिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.शहरातील बीआरटी बसचे जाळे आणि एकूण फेऱ्यांची संख्या समाधानकारक नाही.या प्रणालीत आणखी बसेसचा समावेश करण्याची गरज आहे. बीआरटी मार्गाचे बसस्थानक,संकेत फलक आणि प्रवेश यासारख्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.’

बीआरटीचे महत्त्व जगात अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अनेक देशांत, शहरांत ही व्यवस्था वापरली जाते.आपल्याकडेही या योजनेचा अंगीकार झाला आहे.शहरात ११० किलोमीटर बीआरटीचे जाळे अद्याप पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण करावे आणि बीआरटी सक्षम करावी, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

बीआरटीचे फायदे

- स्वतंत्र लेनमुळे बस वाहतूक वेगात

- प्रवाशांचा प्रवास सुरक्षित

- नियोजीत वेळेत इच्छितस्थळी पोचणे शक्य

- कमी जागेतून जास्त प्रवाशांची वाहतूक शक्य

- प्रदूषण कमी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT