barti  sarkarnama
पुणे

UPSCमध्ये बार्टीचा झेंडा ; मुंडेंकडून नऊ विद्यार्थ्यांचे कौतुक

अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी (UPSC)परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कौतुक केले आहे.

बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात हे 9 विद्यार्थी भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.

यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.

विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या प्रयत्नांना सार्थक करणारे आहे, या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे अधिकारी म्हणून काम करताना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सतत आपल्या पदाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT