Dr. Nilam Gorhe
Dr. Nilam Gorhe Sarkarnama
पुणे

Dr. Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवा !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाविकास आघाडी सरकारने (Maha vikas aaghadi Government) जे काम करून दाखवले त्यापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. या माध्यमातून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट करण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र, राज्यातील सामान्य जनता जागरूक आहे. त्यामुळे या सरकारला मतदानाच्या माध्यमातूनच जनताच उत्तर देईल, असे मत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत जे मोठे झाले. ते लोक आता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना दोष देत आहेत. त्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातून काहीही होणार नाही. निवडणुकीत होणाऱ्या मतदानातून जनता यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न राज्यातील जनता पाहात, असे अशी टीका डॉ. गोऱ्हे यांनी केली.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे, देशाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत तातडीने आढावा घेण्यात आला. मात्र, इतके दिवस स्थानिक लोक या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. त्याची काळजी सरकार करणार की नाही. या रस्त्याच्या कामात यापूर्वीच सुधारणा व्हायला हवी होती, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज आहे. त्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी राज्य चालवणारे प्रमुख केवळ शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवत आहेत. त्यांच्या टीकेने शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. शिवसेना पुन्हा नव्या जोमाने पूर्वीइतकीच ताकदवान होणार आहे, असा विश्‍वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT