D.S.Kulkarni News Sarkarnama
पुणे

DSK Statement News : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, 5 वर्षे जेल; तरी डीएसके 'या' कवितेचा दाखला देत म्हणाले...

DSK Fraud Case : मागील पाच वर्षांपासून डीएसके दाम्पत्य तुरुंगात होते....

Deepak Kulkarni

Pune News : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे एकेकाळी पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं बडं प्रस्थ म्हणून ओळखले जात होते, पण गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तब्बल तीन वर्षांनंतर ते जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले आहेत.

पण एकीकडे हजारो ठेवीदारांची काही हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. त्याच डीसकेंनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा दाखला देत त्यांनी खडतर काळातून पुन्हा उभारी घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील पाच वर्षांपासून डीएसके दाम्पत्य तुरुंगात होते. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे. आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.

याच डीसके(DSK) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना ग्राहकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, त्यांनी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा दाखला दिला.

डीएसके यांनी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध अशा कणा कवितेतील दोन ओळी सादर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या काव्यपंक्ती सादर करत अधिक भाष्य करणं टाळलं.

काय आहे प्रकरण...?

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींवर गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक (Fraud Case) करण्याचा आरोप आहे. त्यांची सध्या जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके पाच वर्षांनंतर जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले आहेत. एकीकडे गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरीच असताना डी. एस. कुलकर्णींची मात्र जामिनावर सुटका झाली आहे.

गुंतवणूकदारांचे 800 कोटी अधांतरीच...

तब्बल पाच वर्षांनंतर डी. एस. कुलकर्णी जामिनावर(Bail) बाहेर आले आहेत. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरी आहेत, येणाऱ्या काळात ते त्यांना परत मिळणार का? याचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT