BJP Diwali Kit
BJP Diwali Kit  
पुणे

Diwali Kit| म्हणून.. दिवाळीचे आनंदी शिधा वाटप रखडले

उत्तम कुटे: सरकारनामा

BJP Diwali Kit पिंपरी : दिवाळी फराळासाठी लागणारे चार जिन्नस (एकेक किलो रवा,पामतेल,साखर,डाळ) शंभर रुपयांत देण्याची आनंदी शिधा ही योजना राज्य सरकारने जाहीर केली. पण, नियोजनअभावी ती फसली आहे. कारण दिवाळी सुरु होऊन दोन दिवस झाले ,तरी हा शिधा पिंपरी-चिंचवडमध्ये आला नसल्याने त्याचे वाटपच आजपर्यंत झालेले नव्हते.त्यामुळे शहरातील गरिबांच्या दिवाळीचा काहीसा बेरंग झाला आहे.

दरम्यान, या चार वस्तू शहरात न आल्याने या आनंदी शिध्याचे वाटप झाले नाही.त्याला महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार आणि शहरातील आकुर्डी येथील शिधावाटप दुकानदार विजय गुप्ता यांनी दुजोरा दिला. त्याला काळेवाडी येथील दुसऱ्या एका शिधावाटप दुकानदाराने, तर एकही वस्तू आजपर्यंत आली नसल्याचे सांगितले.यासंदर्भात शहराचे शिधावाटप अधिकारी रावसाहेब टावरे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तो झाला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीत या चार वस्तू देऊन त्यांचे वाटप करण्यास सांगण्यात आले आहे.मात्र, राज्यात काही ठिकाणी हे जिन्नस आले,मात्र ते ज्यामधून देण्यात येणार आहेत,त्या पिशव्याच न आल्याने त्याचे वाटप रखडले आहे.त्याला रेशन दुकानदारांच्या राज्य फेडरेशनचे पदाधिकारी गुप्ता यांनी दुजोरा दिला. त्यांच्या दुकानात फक्त रवा आणि तेल या चारपैकी दोनच वस्तू आल्या आहेत,अशी माहिती त्यांनी आज सरकारनामाला दिली.त्यात या वस्तूंचे वाटप होणाऱ्या शिधावाटप दुकानातील पॉस मशिन या सर्व्हर डाऊन असल्याने बंद आहे. त्यामुळे पिशव्या व इतर दोन वस्तू आल्या,तरी वाटपातील अडथळा कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

दिवाळीच्या तोंडावर अत्यंत घाईघाईने ही योजना आणली. तसेच तिचे व्यवस्थित नियोजन केले गेले नाही. म्हणून ती फसली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला.म्हणून त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज `गोरगरिबांचा आनंदी शिधा फक्त चित्रात,दिवाळीचा फराल मात्र राज्य सरकारच्या पात्रात`या बॅनरखाली पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन केले.अन्न सुरक्षा योजनेतीलच लाभार्थ्यांना हा शिधा देण्याऐवजी सरसरकट तो सर्वांना मोफत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.तर, काही ठिकाणी या शिध्याचा काळाबाजार होत असून शंभर रुपयांऐवजी तो तीनशे रुपयांना विकला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी याप्रसंगी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT