Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil News : नव्या आकाशी, नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी; या गाण्यामुळे इंदापूरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

Political News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेतील, अशी चर्चा रंगली आहे.

Sachin Waghmare

Pune News : इंदापूर विधानसभा मतदारसंघात अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील 'नव्या आकाशी, नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी', या गाण्याने सध्या धुमाकुळ घातला आहे. या गाण्यामुळे सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेतील, अशी चर्चा रंगली आहे.

इंदापूर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना दोन वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे येत्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोणत्या पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरणार याची चर्चा सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे. (Harshvardhan Patil News)

येत्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याने लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

त्यातच आता हर्षवर्धन पाटील फॅन्स क्लबच्या माध्यमातून नव्या आकाशी, नवी भरारी; हाती आपल्या विजयाची तुतारी हे गाणे इंस्टाग्रामवरून व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेतील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले आहेत. विधानसभेची आगामी निवडणूक इंदापूरमधून लढविण्याचे सूतोवाच त्यांनी यापूर्वीच केले आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांचीही दोन वेळा भेट घेतली आहे, त्यामुळे पितृपंधरवड्यानंतर हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता राज्याला असणार आहे.

महायुतीमध्ये विद्यमान आमदार असल्याने इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या गोटातून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत पाटील यांच्यावर प्रचंड दबाव आहे. शिवाय पाटील यांचीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT