ACB News : विना वेतन काम करणाऱ्या महिला शिक्षिकेला वेतन सुरू करण्यासाठी 'शालार्थ आयडी’ची आवश्यकता होती. मात्र, ते देण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षकास एसीबीने रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव रावसाहेब भगवान मिरगणे असे आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात सहशिक्षिका म्हणून २०१६ काम करणाऱ्या महिलेला वेतन मिळत नव्हते. ‘शालार्थ आयडी’ नसल्याने विना वेतन काम करावे लागत होते. ‘शालार्थ आयडी’ मंजूर झाल्यानंतर त्यांना नियमित वेतन सुरू होणार होते. त्यासाठी त्यांनी आयडी मंजुरीसाठीचा प्रस्ताव जून महिन्यात पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता.
दरम्यान, आयडी ‘ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे मंजूर करण्यासाठी मिरगणे यांनी एक लाख रुपयाची मागणी केली. त्यावेळी महिला शिक्षिकेच्या पतीने एसीबीकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार केली. 17 नोव्हेंबर तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘एसीबी’ च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या पडताळणीत लाच मागितली असल्याचे निष्पण झाले.
त्यानुसार एसीबी अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.25) सापळा रचून मिरगणे यांना एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश वाळके करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.