We know Who is Spreading Rumours about Government Say Ekanath Shinde
We know Who is Spreading Rumours about Government Say Ekanath Shinde 
पुणे

एकनाथ शिंदे म्हणतात....अफवांना हवा कोण देत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे 

मंगेश कोळपकर

पुणे : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे, ते शिवसेना सोडणार नाहीत. तसेच मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत. या बाबतच्या उठलेल्या या बातम्या म्हणजे वावड्या आहेत. त्यांना हवा कोण देत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिले. 

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी शिंदे रविवारी शहरात आले होते. कृषी महाविद्यालय येथील भुयारी मेट्रोची पाहणी झाल्यावर ते म्हणाले ''पुणे शहरातील मेट्रो सक्षम करणार असून त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीची होईल यासाठी नगरविकास खात्याच्या प्रयत्न करणार आहे.'' या बाबत आढावा घेऊन मेट्रोच्या मार्गांच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी आणि दहा रुपयांत शिवभोजन देण्याचा निर्णय, हा महाविकास आघाडी सरकारने अल्पावधीत घेतलेला मोठा निर्णय आहे.  त्या मुळेच भाजपच्या पोटात दुखत आहे. म्हणूनच ते वावड्या उठवत असून अफवांना हवा घालत आहेत, असाही टोला शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT