Maharashtra CM Eknath Shinde congratulates Ravindra Dhangekar on his appointment sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : धंगेकरांसाठी एकनाथ शिंदेंनी निर्माण केलं नवीन पद अन् दिली 'ही' महत्त्वाची जबाबदारी!

Eknath Shinde creates new post for Ravindra Dhangekar : आगामी महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या पदाबरोबरच एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवल्या आहेत.

Sudesh Mitkar

Eknath Shinde Appoints Ravindra Dhangekar to New Leadership Role : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी एक नवीन पद निर्माण करून त्यांनी एक महत्त्वाची जबाबदारी धंगेकरांवर सोपवली आहे.

निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काही महिने उलटल्यानंतर देखील रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी सोपवली नव्हती.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी एक नवीन पद निर्माण करत त्यांना पुणे महानगर प्रमुख केलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी निर्माण केलेले हे पद शहराध्यक्षाच्या वरचं असणार आहे. भविष्यामध्ये पुणे शहरांमध्ये एक किंवा दोन शहराध्यक्ष होऊ शकतात मात्र त्या शहराध्यक्षांच्या वरती हे पुणे महानगर प्रमुख पद असणार आहे.

या पदावर आता रवींद्र धंगेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांना मोर्चे बांधणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. तसेच आगामी महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या पदाबरोबरच एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवल्या आहेत.

महानगर प्रमुख म्हणून काय जबाबदारी? -

पुणे महानगर प्रमुखपद हे शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. महानगर प्रमुखाच्या अंतर्गत दोन ते तीन शहर प्रमुख असतील आणि संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT