Eknath Shinde, Deepak Kesarkar
Eknath Shinde, Deepak Kesarkar sarkarnama
पुणे

'...मग आम्हाला दिपक केसरकरांसारखा संत माणूस भेटला!'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मी काम करणारा कार्यकर्ता आहे. फायली फिरत राहतात, फायलींचा प्रवास आपल्याला कमी करायचा आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) सरकार आले आहे. जनतेने भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

शिंदे सासवडमध्ये बोलत होते. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अनेक जाणांना मंजूर नव्हते. मला अनेक लोक मला सांगत होते, हे थांबवा म्हणून. मुख्यमंत्री आपले पक्ष प्रमुख झाले, असेही शिंदे म्हणाले. मला आपले आमदार खासदार येवून भेटत होते. नगरसविकास खात्यामधून त्यांना मी मदत दिली.

कपट कारस्थानामुळे शिवतारे यांचा पराभव झाला. ते कपट कास्थानीच लोक आहेत, विजय शिवतारे आणि आपण सरळ लोक आहोत, असेही शिंदे म्हणाले. लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. मात्र, आम्ही सत्ता सोडून पायउतार झालो. मला निवडून येण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज लागत नाही, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे आमदार पडले असते म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुरंदरचे विमानतळ दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला. एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा माणुस आहे. थोडे मागे राहिलो असतो तर आमचा कार्यक्रम झाला असता. काही लोकांना वाटते की आम्ही राजकीय आत्महत्या केली आहे. अनेक उपमा आम्हाला दिल्या गेल्या आहेत. आम्ही शांत होतो पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत.

मग आम्हाला दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यासारखा संत माणूस भेटला. सगळ्यांना उत्तर द्यायचे काम केसरकर यांनी सुरू केले. त्यामुळे बाकीचे काम करायला आम्हाला मोकळीक मिळाली. शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला गेल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत एकनाथ शिंदे यांची बाजू केसरकर यांनी भक्कम पणे मांडली होती. त्यामुळे शिंदे यांनी केसरकर यांचा संत म्हणून उल्लेख केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT