Pune 21 Jan 2025: महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
एकीकडे शिंदे नाराज असल्याचा सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मंत्री उदय सामंत हे वीस आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये फूट पडणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत वक्तव्य केला आहे.
पुण्यामध्ये अमोल कोल्हे यांनी विविध विषयांवर ती पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले आहेत. "महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीच्या संदर्भात कौतुक झालं पाहिजे. मात्र येणारी गुंतवणूक कागदावर नको ती प्रत्येक्षात यावी," अशी अपेक्षा असल्याचे कोल्हे म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीबाबत छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, "काही नेत्यांकडून शिळ्या कढीला ऊत आणण्याच्या प्रयत्न होत आहे. त्या शपथविधीबाबतची वक्तव्य ही मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर येत असतील तर याची कारण मीमांसा करणं आवश्यक आहे. मात्र जुन्या गोष्टी उकरून उतरून यातून साध्य काय होणार आहे,"
सातत्याने महायुती सरकारमधील नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "राज्य सरकार अस्तित्व आल्यानंतर सुद्धा सरकार सुरळीत काम करतय का? सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. पालकमंत्री निवडीसाठी लागलेला वेळ, त्यातून नाराजी, नेते नॉट रिचेबल असणं यावरून हे सरकार चे योग्य दिशेने चाललय असं वाटत नाही. सरकार मधील हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते सक्रिय आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासमोरील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतात आहेत असं दिसत नसल्याची टीका कोल्हे यांनी केली.
शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडून उदय सामंत यांच्यासह 20 आमदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. अमोल कोल्हे म्हणाले, "सध्या पक्ष फुटीबाबत होत असलेल्या चर्चा आणि मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबाबत येत असलेल्या बातम्या यामुळे कुठेतरी आग असल्याशिवाय धूर येत असावा, त्यामुळे कुठेतरी शिंदेंच्या सेनेत सारं काही आलबेल आहे का हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.