Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Eknath Shinde : ...अन् काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्याला दिला इशारा; मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

सरकारनामा ब्यूरो

Shasan Aplya Dari : राज्य सरकार विविध योजनांचा नागिरकांना लाभ देण्यासाठी राज्यभर शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. त्यातून शुक्रवारी (ता. १६) पिंपरी चिंचवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा उपक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच्या काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तर सध्याचे सरकार सर्व कामे वेळेत पूर्ण करत असल्याचा दावाही केला. (Latest Marathi News)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "यापूर्वी राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले तरी सिंचन झाले नव्हते. आता राज्यात सिंचन योजना वाढवली आहे. आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देऊन नागरिकांना वेठीस धरत नाही. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल' अशी आमच्या कामाची पद्धत आहे." सिंचनावर बोलताना शिंदे यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील होता. यावेळी अधिकाऱ्याला दम दिल्याचे ते म्हणाले. तसेच त्याचे कारणही स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील निळवंडे धरणाच्या दोन कालव्यांचे उदघाटन झाले. त्यानंतर घडलेला किस्सा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, निळवंडे धरण (Nilwande Dam) होऊन ५०-६० वर्षे झाले, पण पाणी आतापर्यंत सुटले नव्हते. आम्ही तेथील कालव्यात पाणी सोडले. ८५ किलोमीटरपर्यंत पाणी गेले पाहिजे असे धोरण होते. यावर मात्र विरोधकांनी बोगस असून पाणी शेवटपर्यंत पोहचलच नाही अशी टीका करण्यास सुरुवात केली.

विरोधकांच्या टीकेनंतर संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्याचे शिंदे यांनी नंतर सांगितले. ते म्हणाले, "विरोधकांच्या (Opposition Leaders) म्हणण्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. त्यांना म्हटले की तुम्ही आमच्या हातून पाणी सोडून घेतले आणि पाणी पोहचलच नाही. आता तुमच्यावर कारवाई करू. त्यावर त्यांनी सांगितले की साहेब पाणी ९६ किलोमीटरपर्यंत पोहचले आहे." हे सरकार (State Government) खोटी आश्वासने देत नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हीच आमच्या कामाची पद्धत असल्याचेही यावेळी शिंदे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT