PMC Election Latest News
PMC Election Latest News sarkarnama
पुणे

PMC कडून निवडणूकीसाठी कार्यालयाचा शोध!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election 2022) प्रभाग रचना (Ward Structure) अंतिम झाल्यानंतर आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवडणूक कार्यालय सुरू करण्यासाठी इमारत शोध घेऊन तेथे सर्व अत्यावश्‍यक सुविधा आहेत का याची पाहणी करण्याचे आदेश निवडणूक शाखेने (Election Branch) दिले आहेत. (PMC Election 2022 Latest Marathi News)

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. त्याची प्रभाग रचना व नकाशे जाहीर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या भागात पावसाळा कमी असतो तेथे लगेच निवडणूक घ्यावी व पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथे पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात पावसाचे प्रमाण जे जास्त असते, एकदा पाऊस सुरू झाला की लवकर उघडीप मिळत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणूका सप्टेंबर नंतरच होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुण्यातील निवडणुकांचे वेळापत्रक निश्‍चीत होईल, पण महापालिका प्रशासनाने निवडणूकपूर्व कामाची तयारी सुरू केली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या प्रभागानुसार तेथे त्यांचे निवडणूक कार्यालय सुरू केले जाते. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रभाग निहाय मतदानकेंद्र निश्चित करणे याचे नियोजन केले जाते. त्यासाठी महापालिकेची इमारत किंवा शाळा या ठिकाणी कार्यालय सुरू केले जातील. त्याची पाहणी करून सर्व सुविधा आहेत की नाही याची खातरजमा करावी, आवश्‍यक ठिकाणी कामे करून घ्यावेत अशा सूचना निवडणूक शाखेने क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT