सरकारनामा ब्यूरो
पुणे : भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील युतीची चर्चा सध्या आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी या चर्चेची सुरवात केली. युतीच्या चर्चेची आता लगेच आवश्यकता नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर कले. मात्र, भाजपा-मनसेतील ही युती प्रत्यक्षात आली तरी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी वसंत मोरे आणि भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यात खरोखरच मनोमिलन होईल का ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
नगरसेवक मोरे व माजी आमदार टिळेकर हे पुण्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी. दोघांमधली राजकीय स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकती दोघात अटतटीची लढत झाली.टिळेकर यांचा पराभव झाला. टिळेकर यांच्या आमदारकीच्या काळात त्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी नगरसेवक मोरे यांनी सोडली नाही.मोर मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. महापालिकेत विरोधी पक्षनेते व गटनेते म्हणून त्यांनी काम केलो आहे. हडपसरमधून आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी गेल्या पंधरा र्वापासून ते काम करीत आहेत. कात्रज भागातून मनसेचे नगरसेवक म्हणून ते सलगपणे निवडून येत आहेत.
भाजपा व मनसेची युती व्हावी या विचाराचे असलेले मोरे सध्यादेखील मनसेचे महापालिकेतील गटनेत आहेत.मात्र, महापालिकेत मनसेचे केवळ दोन सदस्य आहेत. एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या मनसेचे पालिकेत सध्या केवळ दोन नगरसेवक आहेत. त्यापैकी मोरे स्वत: एक आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांची मनसेचे शहराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांच्याच नेतृत्वाखाली येती महापालिका निवडणूक मनसे लढणार आहे. त्यामुळे साहजिकच शहरातील मनसेच्या भवितव्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाची ताकद महापालिकेत वाढली पाहिजे यासाठी भाजपाबरोबर युतीचा त्यांचा प्रस्ताव पक्षाच्या भवितव्यासाठी योग्य आहे. मात्र, युती झाली तर ती केवळ पुण्यापुरती होणार नाही. राज्यभरासाठी विचार करावा लागणार असल्याने राज ठाकरे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. तीन किंवा चार सदस्यांच्या प्रभागात निवडून येणे मनसेसाठी अवघड असल्याचे मोरे यांची भूमिका आहे.भाजपाशी युती झाली तरी मनसेचे १५-२० नगरसेवक महापालिकेत दिसतील. मात्र, स्वतंत्र लढले तर आताचा दोनचा आकडा पुढे नेणे आवघड असल्याची जाणीव मोरे यांना आहे. या साऱ्या पाश्वभूमीवर मनसेची भाजपाबरोबर खरोखरच युती झाली तरी एकमेकांचे कट्टर प्रस्पिर्धी असलेल्या मोरे-टिळेकर यांच्यात युती कशी होणार हा खरा प्रश्न आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.