सुनील कांबळे - मागील पाच वर्षांच्या काळात पुणे कॅंटॉन्मेंट मंतदारसंघांचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. मंतदारसंघाचा काही भाग पुणे महालिकेत आणि काही भाग कॅंटॉन्मेंट मध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतो यामुळे कामाचे नियोजन करताना मला त्या पद्धतीने करावे लागायचे.
राज्य आणि केंद्र दोन्हीकडे भाजपची सत्ता आसल्याने मला विकास कामांसाठी निधी आणण्यात यश आले. सामान्य लोकांना माहिती आहे मी कामाचा माणूस आहे, विकास कामांच्या जोरावर मी आगामी निवडणुकीला सामोरा जात असून मतदारांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मियालत आहे.
सुनील कांबळे - ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विधानसभा सत्रामध्ये विशेष मागणी करून विशेष निधीची तरतूद करून घेतली आणि हे बांधकाम पूर्ण करून घेतले. तसेच कोविड काळात हे हॉस्पिटल रुग्णांसाठी खुले करून घेतले. ससुन रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता असलेली वसाहत अतिशय जीर्ण झालेली होती. आता या इमारतीचे स्वरूप बदलून पार्किंगसह पाच मजली इमारत उभी रहात आहे. तसेच पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर दिवसभरात 104 ट्रेन ये जा करतात, घोरपडी येथे साधारण 5 तास रेल्वे फाटक बंद ठेवावे लागते होते .त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना सोसावी लागत होती, गेल्या 40 वर्षा पासून नागरिकांसाठी हा चिंतेचा विषय बनला होता, टु प्रश्न उड्डाणपुलामुळे निकाली लागला.
सुनील कांबळे - कॅन्सरशी लढाई करणाऱ्या हजारो नागरिकांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल मतदारसंघात उभारण्याचा आमचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देणे हेच मुख्य ध्येय आहे. नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन येत्या काळात नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाना सुरू करण्याचा संकल्प आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचे योगदान मिळवण्यात येईल.
सुनील कांबळे - महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा संकल्प आहे. मतदारसंघातील ब्रिटिशकालीन (१८२९ साली) पुलगेट बस स्थानकाला नवीन स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. पुलगेट बस स्थानकाच्या कायापालटाला सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात या बस स्थानकाचे काम पूर्णत्वास नेऊन अत्याधुनिक बस स्थानक साकारण्याचा संकल्प आहे. याशिवाय स्वातंत्र्य चळवळीत लक्षणीय योगदान असणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुण्यातील संगमवाडी येथील स्मारकाचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. तसेच कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उदा. रस्ते, पाणी, स्वच्छता इ. मिळण्यासाठी कँटॉन्मेंट बोर्डाचे महानगरपालिकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सातत्याच्या पाठ्यपुराव्याने सुरू झाली आहे. ती पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
सुनील कांबळे - मी फक्त विकासाचे राजकारण करतो, यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भा ज प महायुतीला आणि त्यांचा येथील प्रतिनिधी म्हणून मंतदारसंघातील विकासाच्या मुद्यांवर डबल इंजिन सरकार मधील आपला हक्काचा आमदार म्हणून येथील मतदार निवडून देतील हा विश्वास आहे.
सुनील कांबळे - विरोधकांची काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना मी काही सांगावे असे मला वाटत नाही, जनतेने माझे काम पाहिले आहे, जनताच त्यांना २० तारखेला मतदान यंत्राच्या माध्यमातून योग्य तो संदेश देईल याची मला खात्री आहे.
सुनील कांबळे - प्रचाराच्या धामधुमीत स्वत:ची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, सकाळी 5 वा. दिवस सुरू होतो तो रात्री उशिरापर्यंत संपतो. कुटुंबासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, आपली धावपळ ते समजून घेतात, सतत आपली काळजी घेतात अशी त्यांची साथ मिळते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.