PMC Pune
PMC Pune Sarkarnama
पुणे

FACT CHECK : पुण्याच्या प्रभागरचनेचा नकाशा फुटला?

ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुण्याच्या (Pune) राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा असेल तर ती आगामी पालिका निवडणुकीतील (PMC election 2022) प्रभागरचना कशी असणार याची. छोट्या कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत प्रत्येक त्या चर्चेत किंवा प्रत्यक्ष कामात आहे. या प्रभागरचनेवरच पुण्यात कोणाची सत्ता येणार, याची गणित ठरणार असल्याचा अनेकांचा विश्वास आहे. या चर्चेत पुण्यातील अभ्यासू नगरसेवकांनी स्वतः तयार केलेली प्रभागरचना सोशल मिडियात व्हायरल केली आणि सगळीकडे त्याविषयीच बोलले जाऊ लागले.

माजी नगरसेवक उज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी ही प्रभागरचना केली. निवडणूक आयोगानेच नकाशा तयार केला असाच समज त्यांनी व्हायरल केलेला नकाशा पाहून अनेकांचा झाला. त्यामुळे हीच प्रभागरचना खरी आहे का, असे प्रत्येक कार्यकर्ता विचारू लागला. या नकाशावार त्यांनी स्वतःचा उल्लेख केला नसल्याने पुण्याच्या प्रभाग रचनेचा नकाशा फुटला, या चर्चेने जोर धरला. याचा मनस्ताप प्रशासनातील अधिकाऱ्यांना सहन करावा लागला.

याबाबत केसकर म्हणाले की प्रभागरचना हा फार अवघड विषय नाही. प्रशासन वेळ काढत होते. त्यामुळे आम्हीच ठरविले की आपण आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काही करू आणि नकाशा तयार केला. हा प्रयोग आहे. प्रत्यक्षात प्रभागरचना अशीच असेल, असा आमचा दावा नाही. महापालिकेकडे यंत्रणा आहे. आमच्याकडे यंत्रणा नसतानाही नकाशा तयार केला.

केसकर यांनी गृहित धरलेली रचना पुढीलप्रमाणे

१) मुळा आणि मुठा नदीच्या वरती पुणे मनपा नवीन हद्दीसह ५ लाख ६७ हजार ८५७ इतकी लोकसंख्या असून त्यात वडगाव शेरी आणि शिरूर विधानसभा मतदारंसंघांचा काही भाग अंतर्भूत होतो. ही प्रभाग रचना उत्तर पूर्व या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी लागेल, यात २०११ च्या जनगणनेनुसार ९ प्रभाग होतील.

२) मुळा नदी खाली आणि मुठा नदीच्या वरती मनपाच्या नवीन हद्दी सह ९ लाख,१ हजार,३३ (९०१०३३) यात शिवाजीनगर, कोथरूड, मुळशी-भोर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचा काही भाग समाविष्ट होतो) यात एकूण 14 प्रभाग निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उत्तर- पश्चिम असे होऊ शकतात.

३) मुठा नदी खाली नवीन हद्दीसह २० लाख ९१ हजार ३८५ लोकसंख्या असून यात 3४ आणि १ प्रभाग २ सदस्यांचा अशी ३५ प्रभागांची रचना होईल. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दक्षिण-पूर्व दिशेने ही रचना असेल. यात कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर, पुरंदर, पर्वती आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असे सर्व मिळून ५८ प्रभाग होतील (५७ प्रभाग ३ सदस्यांचे व १ प्रभाग २ सदस्यांचा असे एकूण १७३ सदस्य)

सध्या पुणे महानगरपालिकेने सादर केलेली प्रभाग रचना याप्रमाणे नाही. निवडणूक आयोगाने ती खात्री करून तपासून घ्यावी, अशी मागणी केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

पुणे महापालिकेची फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणारी निवडणूक किमान दोन महिने तरी पुढे जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहेे. त्यातच निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यात 24 बदल सुचविले होते. त्यामुळे प्रशासनाने केलेली बहुतांश प्रभाग रचना बदलणार असल्याचे स्पष्ट झाले. या 24 बदलांसाठी आयोगाने महापालिकेला सादरीकरण करण्यासाठी दिलेली वेळ पुढे ढकलली त्यामुळे हे बदल ही अद्याप झालेले नाहीत. एकीकडे निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेला वेळ लागत असताना दुसरीकडे नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. प्रभाग रचना निश्चित न झाल्यामुळे व तीन सदस्यांचा प्रभाव असल्याने 2017 च्या तुलनेत यावेळेस मोठा बदल होण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT