jagdish mulik
jagdish mulik  
पुणे

फडणवीस, चंद्रकांतदादा यांचा जगदिश मुळीक यांच्यावर विश्वास

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहर भाजप अध्यक्षपदाची माळ माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या (ता. 29 जानेवारी) रोजी होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नवा शहराध्यक्ष घोषित केला जाणार आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले मुळीक यांच्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाटील या दोघांनीही विश्वास टाकला आहे. या पदासाठी विद्यमान शहर सरचिटणीस गणेश बीडकर यांचेच नाव पुढे येईल, असे अनेकांना वाटत होते. पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याने मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

पुणे महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार असून त्यात पक्षाची कामगिरी उंचावण्याची जबाबदारी मुळीक यांच्यावर येणार आहे. मितभाषी, सर्व गटांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य, प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी असलेला चांगला संपर्क या बाबी मुळीक यांच्यासाठी अनुकूल ठरल्या. विधानसभेतील पराभवानंतर त्यांना तातडीने नवीन जबाबदारी देऊन पक्षाने त्यांना मोठी संधी दिली आहे. पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ, पालिकेतील गटनेते धीरज घाटे अशा तुलनेने तरुण नेत्यांना भाजपने संधी दिली आहे. त्यात आता मुळीक यांचीही भर पडली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT