sar16.jpg
sar16.jpg 
पुणे

फडणवीस म्हणतात; आमदार सरनाईक शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहलेले पत्र हा अंतर्गत शिवसेनेचा प्रश्‍न आहे. त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र, आम्ही स्वतंत्रपणे काम करीत आहे. राज्यातील जनतेसमोरील प्रश्‍नांच्या सोडवणुकीस आमचे प्राधान्य आहे. सध्या आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. येत्या काळात आम्ही बहुमताने सत्तेत येऊ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.(Fadnavis said ; MLA sarnaik is shivsena's Internal problem)


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. या पत्रात सरनाईक यांनी भाजपाबरोबर युती करण्याचा सल्ला ठाकरे यांना दिला आहे. आमदार सरनाईक यांचे हे पत्र बाहेर आल्यानंतर या विषयावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भाने फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ सरनाईक यांच्या पत्रावरून चर्चा सुरू असली तरी तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न आहे. सरनाईक यांच्याप्रमाणे इतरांचीही तशी भूमिका असू शकते. मात्र, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करतोय. आम्ही आमची जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. जनतेचे प्रश्‍न आम्ही मांडत राहू आणि पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ, सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. त्यावर आपण बोलू शकत नाही.’’

आमदार सरनाईक यांच्या पत्रावरून दिल्लीपर्यंत चर्चा सचरू झाली असली तरी फडणवीस यांनी या विषयात अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.शिवसेनेवर जाण्याचा किंवा त्यासंदर्भात काही बोलण्याचे फडणवीस यांनी जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसत आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT