Raj Thackeray-Devendra Fadanvis
Raj Thackeray-Devendra Fadanvis Sarkarnama
पुणे

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीस म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत.

फडणवीस म्हणाले, मोठ्याप्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो, हे तीनही पक्ष एकत्र आल्यामुळे जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत. ती काल केल्याचे दिसलेले. कारण एकटे लढलो तरी जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. ते तिघे एकत्र लढले तरी त्यांची मते वाढलेली नाही. आता काँग्रेसला मिळालेली मते ही सहानुभूतीची मते आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार या बद्दल माझ्या मनात खात्री आहे. असे फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याशिवाय, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा देखील अयोध्या दौरा लवकरच असणार आहे, या विषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, अयोध्येचा दौरा हा कोणीही करायला हरकत नाही. कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहे. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो. मला असे वाटते की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावसे वाटणे यामध्ये काही गैर नाही. प्रभू श्रीरामांचे इतके मोठे मंदिर हे त्या ठिकाणी होत आहे. त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामाची दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT